Initiatives
शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने सर्व बालवाडी व अंगणवाडी विद्यार्थ्यांना खेळणी-साहित्याचे वाटप करण्यात आले.
आयुष्याच्या पुस्तकातील नवा धडा, नवीन शैक्षणिक वर्ष शुभारंभ !
आज पासून नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ होत आहे. यानिमित्त सर्व जिल्हा परिषद प्राथमिक ,माध्यमिक शाळा शिक्रापूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, मिठाई, नवीन पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य व गणवेश देऊन त्यांच्या स्वागत करण्यात आले.
१६ जून २०२५
आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना जे.ई [जपानी मेंदुज्वर ] ,मेंदुज्वर या रोगापासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण करण्यात आले.
ग्रामपंचायत शिक्रापूर आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम साजरा करण्यात आला.
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत हर घर जल या योजनेचा प्रत्येक कुटुंबाला ५५ लिटर पाणी यासाठी नळ कनेक्शन योजनेचा शुभारंभ शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने कळमकर वस्ती याठिकाणी संपन्न झाला.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
उत्पत्ती एकादशीच्या आळंदी यात्रेनिमित्त सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
शिक्रापूर पाबळ फाटा परिसर रिलायन्स पेट्रोल पंप जवळचा ट्रान्सफॉर्मर जळला होता, २४ तासाच्या आत नागरिकांची गरज लक्षात घेऊन महावितरण च्या माध्यमातून बसविण्यात आला यावेळी उपसरपंच सौ. पूजा भुजबळ ,त्रिनयन कळमकर ग्रा प सदस्य , डॉ दातखिळे , गुलाबराव सासवडे, दिपक भुजबळ व परिसरातील नागरीक उपस्थित होते
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर, ता.शिरूर यांनी पुणे विभागात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
आज नरिमन पॉइंट मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब व शालेयशिक्षणमंत्री मा दिपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला…
या प्रसंगी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक वृंद उपस्थित होते.
पावसामुळे कानिफनाथ नगर मधील रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली होती साध्या पाण्याच्या गाड्या येणे बंद झाले होते व रहिवाशांच्या गाड्या देखील रस्त्यावरून नेणे मुश्किल झाले होते. नागरिकांच्या मागणी नुसार शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या सौ पूजाताई भुजबळ यांनी आपल्या भागाला भेट देऊन पाहणी केली व खरी स्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने मुरमाच्या गाड्या मंजूर करून ज्या ज्या ठिकाणी चिखल व गाड्या येण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे त्या ठिकाणी मुरमाची व्यवस्था केली.
याबदद्ल कानिफनाथ नगर व रहिवाशांकडुन विशेष आभार मानण्यात आले
